आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : जळगाव शहरातील शेतकऱ्यांचे वीज भारनियमन बंद करावं, या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा भाजपकडून काढण्यात आला होता. या आक्रोश मोर्चाच्या सभेत भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही, पालकमंत्री झोपा काढत आहेत का? असा सवाल करत टीका केली आहे.
भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी केलेल्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हा पठ्ठा नसता तर तो दिल्लीच्या दरवाजावर गेला नसता, खासदार झाला नसता,’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : राज ठाकरे सातत्यानं आपली भूमिका बदलतात, त्यामुळे…; राज यांच्याविरोधात शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी”
केंद्राकडून कोळसा देण्यात येत नसल्यामुळे राज्यात वीजेचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळेच भारनियमन केलं जात आहे. भाजपला जर खरंच शेतकऱ्यांच्या मागण्या समजत असतील, तर त्यांनी केंद्राला मुबलक प्रमाणात कोळसा पुरवण्यास सांगावं, समस्या आपोआपच सुटेल. भाजपने काल जळगावात मोर्चा काढला, खासदार येथे ओरडण्यापेक्षा जर दिल्लीत ओरडले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. मात्र जखम डोक्याला अन् मलम मांडीला याप्रमाणेच भाजपकडून चुकीचं वागणं सुरू आहे. केंद्राने कोळसा पुरवठा केल्याशिवाय राज्यातील भारनियमन हे कमी होऊ शकत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, जळगाव शहरात सार्वजनिक उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”
“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”
“शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा म्हणाले…; उद्धव ठाकरेंनी मला…”