आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्याचे पडसाद राज्यात देखील उमटायला लागले आहेत. अशातच जळगावमध्ये मध्ये भाजप शिवसेनेत घनकचरा प्रकल्पावरून खडाजंगी पहायला मिळाली.
हे ही वाचा : करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा
घनकचरा प्रकल्पाचा वाढीव निधीबाबत गेल्या महासभेत भाजपच्या सर्व सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर सुध्दा महासभेत एकाच सदस्याचा विरोध नोंदवत सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर केला. इतिवृत्तात भाजप सदस्यांचा विरोध नोंदवून इतिवृत्त मंजूर करावे अशी मागणी भाजपच्या महिला सदस्यांनी केली. त्याला शिवसेना सत्ताधारी गटाने विरोध केला.
दरम्यान, ज्यावेळी महिला सदस्य संतप्त झाल्या. तसेच त्यांनी प्रत्येक मुद्दा खोडून काढत सत्ताधारी गटाची बोलती बंद केली. अखेर सत्ताधाऱ्यांनी नमते घेत भाजप सदस्यांचा इतिवृत्तात विरोध नोंदविला.
महत्वाच्या घडामोडी –
‘…अन्यथा आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू’ ; ब्राह्मण समाजाचा इशारा
जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा