नाशिक : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महासेनाआघाडी होत असताना, नाशिकमध्ये नवी समीकरणं जुळली आहेत. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येऊनही महापौरपद आपल्याकडे राखण्यात भाजपला यश आलं. नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत.
महापौर निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार भिकूबाई बागुल यांनाच मतदान करा, असं मनसेने आपल्या नगरसेवकांना बजावलं होतं.
दरम्यान, भाजप आणि मनसेच्या या जवळीकीमुळे राज्यात नवं समीकरण पाहायला मिळालं आहे. हेच समीकरण आता नाशिक महापालिकेनंतर राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.