Home महाराष्ट्र आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ;...

आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ; केली ‘ही’ मागणी

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे आणि बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : शरद पवारांइतकीच राजकीय उंची असलेल्या ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या; संजय राऊतांकडून काैतुक

ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय… पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे. त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण दीदी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये  या, असे आमंत्रण घेऊन आल्या आहेत का? म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दीदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायला लावायचेय का? सरकार या भेटीतील चर्चा का लपवते? असा सवाल आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

नुकतीच बांगलादेशीयांवर कारवाई झाली.  यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दीदींना देत तर नाही ना? विरोधकांना चिरडणाऱ्या ‘बंगाली हिंसेचे’ धडे तर गिरवले जात नाही ना? महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटनमंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी. तसेच असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

“काँग्रेसची मोठी राजकीय खेळी; गोव्यात भाजप आणि तृणमूलला दिला मोठा धक्का”