“ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ‘त्या’ व्यक्तीला केली अटक”

0
210

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

तसेच हल्लेखोर मॉरिसभाईनेही स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडत आत्महत्या केली. फेसबुक लाईव्ह करून हा प्रकार घडल्याने धक्का बसला आहे. आता या घटनेसंबंघी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

ही बातमी पण वाचा : “ब्रेकींग न्यूज ! ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू”

मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणात एकाला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा सुगावा लागण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बंदूक बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची होती. त्यामुळे त्याच्यावर बंदूक हाताळण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी केली जात आहे. घटनेपूर्वी मॉरिस कोणाला भेटला होता याचाही शोध सुरु आहे. दुसरीकडे, अमरेंद्रची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत लवकरच पुढे येईल. तसेच अमरेंद्रला शनिवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! जळगावमधून भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाने केली ‘ही’ मोठी घोषणा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here