आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कराड : कराडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ‘काँग्रेस दक्षिण’चे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शिलेदार मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव तथा आर आबा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, रवींद्र अनासपुरे, चित्रलेखा माने- कदम आदींच्या उपस्थितीत यादव गटाचा बुधवारी भाजपत प्रवेश झाला.
ही बातमी पण वाचा : राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
राजेंद्र यादव यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता यादव तसेच महिला-बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, नगरसेविका स्वाती तुपे यांच्यासह असंख्य काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.
दरम्यान, राजेंद्र यादव यांच्या भाजप प्रवेशामुळे कराडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत
अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता महाविकास आघडीच्या वाटेवर?