आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. अशातच आता कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेकडून बंडखोरांना मोठा धक्का; आणखी 2 बंडखोर नेत्यांवर सेनेकडून मोठी कारवाई
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी मंडलिक समर्थक गटाने केली. तसेच निर्णयाबाबतचे सर्वाधिकार खासदार मंडलिक यांना देण्यात आले.
दरम्यान, आज कोल्हापूरात मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही आग्रही भूमिका मांडण्यात आली.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं, म्हणाले, ते फक्त…
सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त धक्का; हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सामील
तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन