आयपीएल सुरू होण्याआधी RCB ला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूनं घेतली माघार

0
173

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला संघात स्थान दिलं आहे. रॉयल चॅलेंजर्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, अलिकडेच संपलेल्या न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत फिनने शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

नागपूरमध्ये 21 मार्चपर्यंत कडक लाॅकडाऊन- नितीन राऊत

राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत चालेल- संजय राऊत

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, 3 महिन्यात सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयल स्टोन बंगल्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here