Home महाराष्ट्र अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही

अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आता या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला असून कुणाला कोणतं खातं मिळणार याची देशभर चर्चा होते आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही बातमी पण वाचा : मोदी मंत्रिमंडळात कोण कोण सामील?; फायनल यादी आली समोर

“राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने तथा सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

 मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका नेत्याने दिला राजीनामा