मुंबई | उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. सेनेने अवघ्या अडीच वर्षात भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. लिलाबाई आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने सेनेचा विजय झाला आहे.
खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी भाजपाकडून सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांना उमेदवारी मिळाली होती. तर साई पक्षाकडून उपमहापौरपदावर असलेले जीवन इदनानी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या कलानी कुटुंबाच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली होती.
दरम्यान, नाशिकमध्ये मनसेच्या पाठिंब्यामुळे भाजपने बाजी मारली आहे. नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत.