आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : गुवाहाटीला जाऊन आपल्याला काय मिळालं याचा मोठा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. सांगली येथे दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गुवाहाटीला जाण्यामुळे आमची राज्यात खूप बदनामी झाली. पण त्याची पर्वा नाही. त्या बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ चेहरा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असं म्हटलं त्यावेळी मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाही तर तुमच्यासोबत येत नाही असे मी निक्षून सांगितलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्य सचिवांना फोन केला. त्यावेळी त्यांना कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय मिळालं, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
16 आमदारांच्या अपात्रतेवरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान; म्हणाले…
“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्याची पुन्हा घरवापसी”
उद्धव ठाकरे, यांच्यासोबत जे केलं, तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत…; अजित पवारांचं मोठं विधान