आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीदरम्यान कल्याणराव काळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांच्या सहकारी शिरोमणी कारखान्यासाठी थकहमी देण्यात आली होती.
हे ही वाचा : “आत्ता छावा मैदानात, दसऱ्यानंतर आता वाघही थेट मैदानात उतरणार”
काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची त्यांच्या पुतण्याच्या घरी काळे यांनी भेट घेतली होती. तेव्हापासून काळे हे शिंदे गटात सामील होणार, असे बोलले जात होते.
दरम्यान, काळे यांनी काँग्रेस, काँग्रेसमधून भाजप, भाजपतून शिवसेना आणि शिवसेनेतून भाजप, भाजपतून राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीसाठी काळे हे शिंदे गटात जाणार का, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या घडामोडी –
आंबेडकर चळवळीतील ‘या’ ज्येष्ठ नेत्याची उद्धव ठाकरेंना साथ; शिवसेनेत केला प्रवेश
वेदांता प्रकरणावरून गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीला टोला, म्हणाले, त्यांना वाईनसाठी…