आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लोकसभा निकालानंतर अजित पवार गट चर्चेत आला आहे. अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपला राज्यात अपयश आलं आहे असं कारण आरएसएसने दिलं होतं. त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या.
ही बातमी पण वाचा : गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भुजबळ यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे सध्या भुजबळ नाराज असल्याचं म्हटलं जातंय. अशातच नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनी वेगळा सुर बोलून दाखवल्याने आता तर छगन भुजबळ सत्तेमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली त्यामुळे आता पुढे भुजबळ यांनी निर्णय घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…
माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार यांनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…