आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवारांच्या बंडानतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात वादविवाद सुरू असताना कारण आज काही अनपेक्षित घटना घडली आहे.
ही बातमी पण वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनी कोण? ; अमोल कोल्हेंचा नेमका रोष कोणावर
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. युगेंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेजच अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी श्रीनिवास पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र येणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
भाजपावाल्यांनी शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, आता उद्या आणखी…; उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका
“…म्हणून राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन मोठे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत”