आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : ‘जब हम दो साथ खडे, तो…; रुपाली पाटलांच्या राजीनाम्यानंतर मनसे नगरसेवकाचं ट्विट होतंय व्हायरल
उदयनराजे यांनी नवी दिल्लीतील 6 जनपथ येथे शरद पवारांची भेट घेतली. तसेच शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. उदयनराजे यांनी ट्विट करत या भेटीबद्दल सांगितलं आहे. तसेच उदयनराजेंच्या या भेटीची सर्वत्र चर्चा होत आहे.
आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट.@PawarSpeaks pic.twitter.com/eGpFl3MRIK
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 15, 2021
दरम्यान, उदयनराजे व शरद पवार यांची ही भेट सदिच्छा असल्याचं सांगितलं जात असलं तरी, सातारा जिल्हा बँक निवडणूक आणि आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यातील भाजप नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण…”
सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ
गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा