“मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेनं केली संभाजी ब्रिगेडशी युती”

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेला बंडखोरीमुळे बसलेला फटका या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे.

उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युतीचं स्वागत केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली.

हे ही वाचा : …तर पुन्हा मोर्चा काढणार; सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीनंतर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेच्या ताकदीत वाढ; पंजाब आणि हिमाचलमधील शिवसैनिकांनी दिली उद्धव ठाकरेंना साथ

महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले

 हा पक्ष आहे की चोर बाजार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here