“मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची बहीण उद्धव ठाकरेंसोबत; दिले ‘हे’ मोठे संकेत”

0
552

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच आता शिंदे गटातील एका आमदाराच्या बहिणीनं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं आहे.

आमदार किशोर पाटील हे गेल्या महिन्यात शिंदे गटात सामील झाले होते. मात्र अशातच आता किशोर पाटील यांच्या चुलत बहीण व माजी आमदार कै.आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांच्यासमोर एक मोठं आवाहन उभं केलं आहे.

हे ही वाचा : संभाजीनगर नामकरण वाद हायकोर्टात; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जाहिरातबाजी करून आपण ठाकरें सोबत असल्याचं वैशाली सुर्यवंशी यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी या जाहिरातबाजीत ‘तत्त्वांशी नाही केली तडजोड, विचारांशी सदैव एकनिष्ठ..आणि आता तोच विचारांचा वारसा, असे शब्दप्रयोग करत सुर्यवंशी यांनी ठाकरे आणि मातोश्रीवरची आपली निष्ठा दाखवून दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपचे अनेक निष्ठावंत आमच्या संपर्कात; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात ; शिवसेनेची टीका

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं; शिंदे गटात सामील झालेल्या ‘या’ खासदारांचं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here