Home महाराष्ट्र “मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र सक्तीचा आराम करण्याची सूचना डॉक्टरांनी पवारांना दिली आहे.

5 दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आलं आहे. काही चाचण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या दिसून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर गेली 4 दिवस निरीक्षणाखाली पवारांना ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान, पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली असून कुणालाही बंगल्यात येण्याची परवानगी देण्यात आली नाही. पुढील 7 दिवस ते घरातच आराम करत राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”