मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (एनआयए) मार्ग मोकळा झाला आहे.
‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी एनआयए ने सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली होती.
दरम्यान, आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या घडामोडी –
‘सिक्सर किंग’ इज बॅक! सलग चार षटकार ठोकत युवराजने केले चाहत्यांचे मनोरंजन
…नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा
“काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष, तुम्ही भाजपला मत द्या”
राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली- चंद्रकांत पाटील