नवी दिल्ली : आत्ताच एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आज सकाळी रामनाथ कोविंद यांना छातीत एकाकी दुखू लागल्याचं लक्षात आलं. त्रास असह्य झाल्यानं अखेर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.
सध्या राष्ट्रपतींची प्रकृती स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींचं रुटीन चेकअप करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आर्मी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात लाॅकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत शाळा, काॅलेज बंद राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी- रूपाली चाकणकर
पोलिस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा
मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह