नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आज अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलविली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. तसेच पंकजा मुंडे या अचानक दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर सचिवही उपस्थित आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे
“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही; नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
“नाना पटोले स्वत:ला मुख्यमंत्री समजू लागले होते, पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाच करून टाकला”