आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.खडसे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात
खडसे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, नाथाभाऊंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मीडियाशी संवाद साधताना खडसे यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाथाभाऊंच्या छातीत दुखत होते. आज त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र, खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अखेर मनोज जरांगेनी उपोषण घेतलं मागं; राज्य सरकारला दिली 2 जानेवारीची डेडलाईन
“शमी, सिराज, बुमराहकडून लंकादहन, टीम इंडिया वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये”
…तर परिणाम भोगावे लागतील – मनोज जरांगे