मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी मुंबई महापालिका कार्यालयात असताना किशोर पेडणेकर यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं आपलं नाव न सांगता थेट जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. महापौरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्या व्यक्तीने पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महापालिकेत असताना हा कॉल आला. त्यानंतर 2 दिवसांनी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 504, 506(2), 507, 509 अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपात खरी ताकद असेल तर…; अमोल मिटकरी यांच भाजपला आव्हान
“सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”
“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”
ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर औरंगजेब सेना; भाजपचा सेनेवर हल्लाबोल