Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी: जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष...

मोठी बातमी: जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी केलेल्या आंदोलन केल्यामुळे राज ठाकरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सुनावणीअंती आज जळगाव न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी यासाठी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद जळगावात उमटले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत राज ठाकरे यांना न्यायालया ने वॉरंट देखील बजावला होता. त्यानंतर पंधरा हजारांचा जामीन मंजूर करून या खटल्यात गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने राज ठाकरे यांना दिली होती. या सुनावणीअंती आज जळगाव न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, पदाधिकारी रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

हे ही वाचा : पर्पल कॅप विजेता हर्षल पटेलवर लागली ‘इतक्या’ कोटींची बोली; RCB नं घेतलं आपल्या ताफ्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी केलेल्या आंदोलन केल्यामुळे त्यांना 21 ऑक्टोबर 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी जळगाव येथे मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वाखाली अॅड.जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरवर “फाशी द्या लालूला आधी जोडे मारा साल्याला” असे लिहून घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले. तसेच आंदोलन करणाऱ्यांनीही पोलिसांना पाहिल्यावर पळापळ सुरु केली. यावेळी वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्टेबल श्यामकान्त पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांविरूध्द 21 ऑक्टोबर 2008 रोजी कलम 143, 147, 427, 109, मुंबई पोलिस अॅक्टचे कलम 135 तसेच महाराष्ट्र डॅमेज अॅक्टचे कलम 03 व 07 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या घडामोडी –

लक्षात ठेवा, आमचे सरकार पडणार नाही आणि मी…; संजय राऊतांचा इशारा

“चेन्नईचा ‘हा’ आक्रमक खेळाडू आता खेळणार RCB कडून; तब्बल ‘इतके’ कोटी देऊन RCB संघात सामील”

शिवसेनेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; गोव्यातून आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी