मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने समन्स पाठवलं असून त्यांना 5 मे रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे.

मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात शरद पवार यांची चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल व मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाने यापूर्वीही पवार यांना साक्ष नोंदवण्याकरिता पाचारण केले होते. मात्र, त्यावेळी पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे सांगून आयोगाला पुढची तारीख देण्याची विनंती केली होती.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दणका; हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं घड्याळ”

शरद पवारांनी केलेल्या विनंती प्रमाणे आयोगाने मुंबईत 5 ते 11 मे या कालावादीत होणाऱ्या सुनावणीदरम्यान 5 मे रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. चौकशी आयोगातर्फे मुंबईत 5 ते 7 मे आणि 9 ते 11 मे असे सहा दिवस साक्षी नोंदवण्याचे काम होणार आहे. त्यापैकी पहिल्याच दिवशी पवारांना चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

स्वत:वर हल्ला झाला म्हणून, काही लोक ओठाखाली साॅस लावून फिरतात आणि…; संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

तब्बल 18 दिवसांच्या कोठडीनंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका, बाहेर येताच म्हणाले…

“भाजपचा मनसेला धक्का; ‘या’ माजी मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here