आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच आता शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते राजू विटकर हे पुन्हा शिवसेना पक्षात स्वगृही परतले आहेत.
हे ही वाचा : “सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”
पुणे झोपटपट्टी शिवसेनेचे विभाग प्रमुख राजू विटकर हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. मुंबईतील एका शिंदे गटाच्या मेळाव्यातही ते सहभागी झाले होते. मात्र, घरी परतल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेने आतापर्यंत आपल्याला काही कमी केले नाही. हाच पक्ष आपल्यासाठी चांगला असल्याचे सांगितले, तर तुम्ही घेतलेला निर्णय घरच्या कुणालाच आवडलेला नसल्याचे म्हणताच राजू विचकर यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी आपण शिवसेनेतच सहभागी होणार याबाबत पक्ष प्रमुखांना पत्रही लिहिलं आहे.
राजू विटकर यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं भावनिक पत्र :
सध्या शिवसेना पक्षाची झालेली अवस्था यामुळे शिवसैनिक हा भावनिक होत आहे. त्याचा प्रत्यय आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही आलेला आहे. राजू विटकर यांनी तर पक्ष संघटनेसाठी पुण्यात काम केले आहे. त्यामुळे पक्षाची झालेली अवस्था पाहून आपण परतल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे यासाठी आपण आई जगदंबेला प्रार्थना करीत असल्याचेही सांगितले आहे. एवढेच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन पुन्हा शिवसेना कुटुंबात सहभागी करुन घ्यावे, असं भावनिक आवाहन विटकर यांनी उद्धव ठाकरेंना पत्रातून केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
“सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”