आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हे भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यातील खालकर मंदिरात पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं.
हे ही वाचा : धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मिळाली अवघी ‘इतकी’ मतं
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यातील खालकर मंदिरात महाआरती पार पडली आहे. तसंच यावेळी हनुमान चालिसेचं पठणही करण्यात आलं. मंदिर परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: रस्त्यावर उतरत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय