मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँडरींग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने देशमुखांशी संबधित राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, हे प्रकरण आर्थिक गुन्ह्यांशी निगडित असल्यामुळे आता ईडीने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय- एकनाथ खडसे
“भाजप सरकार कोरोनाबळींचे खोटे आकडे दाखवतंय”
मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे- नवाब मलिक