आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली | इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काँग्रेसने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून यावरून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला आहे.
इस्लामपूरमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी इस्लामपूरमधील राष्ट्रवादीचे कार्यालय काँग्रेसच्या ताब्यात देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ‘या’ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल”
काँग्रेस नेत्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी या नेत्यांना शनिवारी माहाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, पक्ष कार्यालय राष्ट्रवादीचच आहे. आतापर्यंत काय झोपला होता का? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाने केला आहे. तर कार्यालयात राजारामबापूंचा संबंध नाही. राजारामबापूंनी मालक होण्याचा प्रयत्न केला. भाड्याच्या घरात राहण्याने मालक होता येत नाही. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा आणि कार्यालय मोकळ करा, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आम्ही उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले?: भर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकच काढलं”
भाजपाच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..“माझा जीव जाता जाता वाचला”
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार? काँग्रेस फुटणार? ; देवेंद्र फडणवीसांच सूचक विधान