“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

0
529

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकाॅप्टर अपघातात भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : शिवसेनेविरोधात मनसे काढणार जनजागरण मोर्चा; मनसेच्या ‘या’ नेत्यांचा इशारा

या हेलिकाॅप्टरमधून बिपीन रावत व त्यांच्या पत्नी हे दोघेही प्रवास करीत होते. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा”

“बिघाडी सरकारला सत्ता हवी, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची हिंमत नाही”

2024च्या लोकसभेत भाजपा 418 जागांच्या खाली येणारच नाही; चंद्रकांत पाटलांटा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here