आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफासते लावून आत्महत्या केली. या निधनाची बातमी समजताच. अनेक राजकीय नेते तसेच कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहली.
या प्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरु झाला असून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे.
ही बातमी पण वाचा : “आम्ही उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले?: भर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकच काढलं”
नितीन यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून पाचही जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपाच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..“माझा जीव जाता जाता वाचला”
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार? काँग्रेस फुटणार? ; देवेंद्र फडणवीसांच सूचक विधान
नितीन देसाईंच्या आत्महत्येवर, मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा, म्हणाला…