“मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली, शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

0
275

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी आता समोर आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेट घेतली. शेलार यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

एकीकडे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी पवारांची भेट घेतली. मात्र असं असलं, तरी ही राजकीय भेट नसल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर…; राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील आगामी वर्ल्ड कप, त्यातील वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने, शिवाय एमसीएचे काही मुद्दे यांवर चर्चा करण्यासाठी आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोेलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मी, तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, महाविकास आघाडीची एकजूट कायम राहणार”

 उद्धव ठाकरेंबद्दल, बोलताना राज ठाकरे भावूक, म्हणाले, आमच्या नात्यात कोणीतरी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here