मुंबई : येत्या 19 ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. नारायण राणे यात्रेची सुरूवात शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या दर्शनाने करणार आहेत. मात्र आता राणेंच्या यात्रेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.
राणे यांची वरळीमध्ये नियोजित सभा होती. मात्र राणेंच्या या यात्रेतून युवा सेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ वगळण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. उद्या दिनांक 19 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन राणेंच्या यात्रेला सुरुवात होईल. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांच्या यादीत; प्रविण दरेकरांची टीका, म्हणाले…
शिवसेना म्हणजे खंडणी सेना आणि ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार- किरीट सोमय्या
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्किल झालं; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात
“तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”