Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”

“ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिप्ट; दिवाळीनंतर 1 डोस झालेल्यांना सर्वत्र फिरण्याची मुभा?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात खाली येत आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या 2 हजारच्या खाली आली असून मृत्यू संख्याही कमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

हे ही वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची खेळी; एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभारणार

‘एक लस घेतल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश देण्याच्या आणि राज्यात संपूर्ण अनलॉक करण्याच्या विचारात आहेत,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी आज दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सामोरं जावं लागत असलेल्या या असुविधेतून सुटका करण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे., असं राजेश टोपे म्हणाले.

टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील. राज्यात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो., असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.

दरम्यान, कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिलेला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्याने लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल’, असं टोपेंनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार जेंव्हा संसदेत होते, त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते”

भाजपने बेईमानी केली नसती, तर उद्धव साहेबही बेईमान झाले नसते- गुलाबराव पाटील

पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा