“भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, 50 कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
364

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच भोरमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं.

हे ही वाचा : शरद पवारांशी बोलताना जरासं भान बाळगा; निलेश लंके चंद्रकांत पाटलांवर भडकले

भोर तालुक्याच्या हिर्डोशी खोऱ्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या 50 कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केलं. हिर्डोशी खोऱ्यातील प्रत्येक गावात काँग्रेसच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. याच विकासकामांच्या जोरावर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस बाजी मारणार, असा दावा संग्राम थोपटे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

“चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हांला शहाणपण शिकवू नये”

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मिरजेत नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here