Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील हाॅटेल्स रात्री 12 पर्यंत, दुकाने रात्री 11...

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील हाॅटेल्स रात्री 12 पर्यंत, दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू राहणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात खाली येत आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या 2 हजारच्या खाली आली असून मृत्यू संख्याही कमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व उपहारगृहे तसेच हाॅटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सूरू ठेवण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती तसेच निर्बंध या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा : भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे; शिवसेनेच्या ‘या’ नेताचा आक्रमक पवित्रा

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यातील सर्व उपाहारगृहे तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच इतर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मुंबई वगळता इतर शहरांतील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपनं मनसेच्या नादी लागू नये, पुण्याचं महापाैरपद आम्हाला मिळालं पाहिजे- रामदास आठवले

मनसे इम्पॅक्ट ! विश्व करंडक टी-20चं समालोचन मराठीत

“‘अबकी बार, महंगाई पे वार’; वाढत्या महागाईविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन”