Home महत्वाच्या बातम्या महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य...

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांचं लवकर पुण्यात भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. पुण्यातील हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार असून या स्मारकाच्या कामाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे.

हे ही वाचा : ‘…पण मोर्चा काढूच’; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा

स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन आणि त्यांना विश्वासात घेऊन काम करावं. तसेच स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचना यांचा आधार घ्यावा, अशा सुचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि रक्षणासाठी संभाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो; महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य

“जिथे संकट तिथे शिवसेना, हा इतिहास आहे”

पुरात वाहून आलेले पुण्याच्या स्वयंघोषित दादांनी आपल्या मतदारसंघात…; रूपाली पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला