सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; सांगलीची जागा मिळाली ‘या’ पक्षाला

0
274

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीच्या जागेवरून अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू होतं. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाला. मात्र आता तो वाद निवळला असून सांगली लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांना मिळाला आहे. या जागेवर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत.

सांगली जिल्ह्यातून सध्या भाजपचे नेते संजय पाटील हे खासदार आहेत. दोन्ही वेळा संजय पाटील हे खासदार झाले. त्यांना पराभूत करणे हे महविकास आघाडीचं लक्ष्य आहे. मात्र या जागेवर चंद्रहार पाटील यांना मदत करतील का? हे पाहणं गरजेचं आहे.

ही बातमी पण वाचा : “सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल”

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षाला विश्वासात न घेता सांगलीच्या जागेवर दावा केला. उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या  जागेवर उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. सांगलीत काँग्रेसचे मतदार अधिक असून काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर दावा केला होता. मात्र सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश

 पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट ; वसंत मोरेंना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here