मुंबई : करोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडं मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
‘राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन दिले जाणार आहे. सरकारनं ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सरकारनं हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष?, शरद पवार संतापले
करोनाबद्दलच्या ‘या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका; शरद पवारांचं जनतेला आवाहन
अजिंक्य रहाणेनं कोरोनाग्रस्तांसाठी केली ‘इतक्या’ रुपयांची मदत
रामदास आठवलेंनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक; म्हणाले…