MVM सेमी इंग्लिश शाळेत बोरन्हाण संपन्न, काळे कपडे घालून विद्यार्थ्यांचा उत्साह

0
11

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे – आज मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमीच्या निमित्ताने MVM सेमी इंग्लिश आणि मराठी पूर्व प्राथमिक विभागांमध्ये मिनी केजीच्या मुले आणि मुलींचे बोरन्हाण आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी काळे कपडे घालून आली होती. तसेच या चिमुकल्यांच्या पालकांनी हलव्याचे दागिने पाठवले होते. ते घालून मुलांचे चिमुकल्यांचे औक्षण केले.

ही बातमी पण वाचा : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त

दरम्यान मुलांना चुरमुरे, छोटी बिस्किटे, गोळ्या, बोरांनी बोरन्हाण घातले. यावेळी पतंगाचे डेकोरेशन केले होते. मुलांना बोरन्हाणाचा खाऊ खूप आवडला. तसेच यावेळी शिक्षकांनी चिमुकल्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून त्यांना सूर्य नमस्कार घालायला शिकवले. हा व्यायाम रोज सूर्योदयाच्या वेळी कोवळ्या उन्हात करायचा, अशी शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यात राबवणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here