आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी माजी आमदार अशोक टेकवडे हे उद्या भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. टेकवडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
ही बातमी पण वाचा : मुनगंटीवार म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी, आता राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल, म्हणाले…
टेकवडे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, टेकवडे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. त्यामुळे राष्ट्रवादीत जास्त दिवस राहणार नाहीत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज त्यांनी, पक्षाला राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला ऊर्जा मिळाली”
कर्नाटक निवडणूकीवरून राज ठाकरेंचा, भाजपला टोला, म्हणाले…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा..; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल