“IPL 2022 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ आक्रमक गोलंदाज आयपीएल खेळणार नाही”

0
310

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. कारण दिल्लीचा हा स्टार गोलंदाज आयपीएल 2022 मधून बाहेर पडू शकतो.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीच्या अधिकाऱ्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या माहितीनुसार, एनरिक नॉर्खिया आयपीएलमध्ये खेळणं कठीण आहे. दुखापतीमुळे तो नोव्हेंबरपासून फारशी गोलंदाजी करू शकलेला नाही. वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानंतरच त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली जाईल.

हे ही वाचा : “केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”

दरम्यान, एनरिक नॉर्खिया ​​हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. तसेच बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याला दक्षिण आफ्रिकन संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळं जर नॉर्खिया ​​आयपीएल 2022 मधून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का असेल.

महत्वाच्या घडामोडी –

आता मनसेकडूनही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी; कोकण भवन कार्यालयासोमर काढला भव्य मोर्चा

‘…तर तुमचे वांदे होतील’; निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना टोला

तृतीयपंथी सपना आणि बाळू अखेर अडकले विवाह बंधनात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here