IPL 2021 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर IPL मधून बाहेर?

0
196

मुंबई : पहिल्या वन डे सामन्यादरम्यान टीम इंडियातील 2 खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे ते वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आहे. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तर याचा मोठा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसला आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

श्रेयस अय्यर आयपीएल 2021 च्या चौदाव्या हंगामासाठी खेळू शकणार नाही. खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे संपूर्ण आयपीएल होईपर्यंत श्रेयस अय्यर खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर एक्स रे काढण्यात आला. त्यामध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस श्रेयसला क्रिकेट आणि मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. शस्त्रक्रियेबाबत अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र ती करावी लागली तर श्रेयस IPL चा संपूर्ण हंगाम बाहेर असणार आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चाैकशी लावा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे- अनिल देशमुख

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री वर्षा बंगल्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो; नाना पटोले यांच फडणवीसांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here