आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत व इतर काही जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे काँग्रेस-शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्याचा अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”
उत्तर गोवा काँग्रेस सेवा दल प्रमुख उल्हास वासनकर यांनी बुधवारी त्यांच्या समर्थकांसह आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय काँग्रेसच्या महिला शाखेच्या माजी सरचिटणीस प्रिया राठोडही तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. तर शिवसेनेचेही नेते तृणमूलमध्ये गेले आहेत. शिवसेनेचे ब्लॉक अध्यक्ष विनोद बोरकर त्यांच्या समर्थकांसह टीएमसीमध्ये सामील झाले. पणजीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री मानस राजन भुनिया आणि गोवा टीएमसी नेते मारिओ पिंटो आणि विजय पै उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?; मनिषा कायंदे म्हणाल्या…
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; सोलापुरातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश”