परळीत भाजपला मोठा धक्का; धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय

0
1239

बीड : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाने परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

परळी तालुक्यातील निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला.

राष्ट्रवादीनं विजय मिळविलेल्या ग्रामपंचायती

  1. वंजारवाडी बिनविरोध
  2. रेवली बिनविरोध
  3. सरफराजपुर
  4. मोहा
  5. लाडझरी
  6. गडदेवाडी

महत्वाच्या घडामोडी-

चौंडी गावात राम शिंदेना धक्का; रोहित पवारांची बाजी

“सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

“धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

चंद्रकांत पाटीलांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का; खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here