मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

0
368

मुंबई : मुंबईमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. कारण, माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय.

कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. पण तिथे ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केलाय.

दरम्यान,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते.

महत्वाच्या घडामोडी-

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे”

“मोठी बातमी! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड”

भाजपच्या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे- विजय वडेट्टीवार

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here