कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

0
445

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची मोजणी झाली असून यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या 96226 इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 77426 इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे.

महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

हे ही वाचा :  “कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”

या पोटनिवडणुकीसाठी राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची जोरदार प्रचार फौज उतरली होती. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं होतं. अशात पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.

दरम्यान, विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आपले हिंदुत्व आणि स्वाभिमान विजयी झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 “कायम राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारा मी माणूस, पण पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो”

…तर कारवाई केली जाईल; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून रूपाली पाटलांचा इशारा

खरंच मनसे भाजपासोबत युती करणार का?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here