आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंद्रपूर : आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. यात चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत आहे. यामध्ये प्रतिभा धानोरकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर 1 लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाची कुठेही आघाडी नाही
दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र त्यांच्या विरोधात त्यांच तोडीचे उमेदवार म्हणून भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सांगलीतून मोठी बातमी समोर; विशाल पाटील यांनी घेतली प्रचंड मोठी आघाडी
मोठी बातमी! सोलापूरात भाजपला धक्का बसनार?; प्रणिती शिंदे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
मोठी बातमी! लोकसभेच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला