शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का; वर्ध्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
461

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मागील दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न योग्य रीतीने सोडवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा प्रभाव पडल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं यावेळी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेचे नगरसेवक उच्चविद्याविभूषित प्रा. डॉ. उमेश तुळसकर, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आसिफ शेख सईद शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी माजी खासदार व संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, हिंगणघाट नगरपरिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, हिंगणघाट शहरप्रमुख सतीश ढोमणे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख”

माझं उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा खोचक टोला

“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here