भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

0
272

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : राजीनामा दिलेले भाजपचे चार माजी नगरसेवक आणि एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कर्त्यानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! शिंदे गटाचे ‘ते’ आमदार अपात्र ठरणार?; विधानसभा अध्यक्ष नोटीस बजावणार”

भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले या चार माजी नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे सर्वजण पाचशे कार्यकर्त्यांसह हैदराबादकडे रवाना झाले. सायंकाळी ज्युबिली हिल्स भागातील बीआरएस भवनात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अर्थंमत्री हरीश राव आदींनी वल्याळ व इतरांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले.

महत्त्वाच्या घडामोडी –

 तुमची असेल-नसेल ती, सगळी ताकद लावा अन्…; येवल्यातील जाहीर सभेतून शरद पवारांचं, पंतप्रधान मोदींना जाहीर आवाहन

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट; म्हणाल्या, तुफानाला तोंड द्यायला…

अजित पवारांच्या शपथविधीआधी 30 जूनला नेमकं काय घडलं?; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली आतली बातमी, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here